गूळ पावडर JAGGERY Powder (500 gm)

गूळ पावडर JAGGERY Powder (500 gm)

Size
Price:

Product Information»

गूळ पावडर JAGGERY Powder

the Healthy Alternative to Sugar. ... Often called “gur” ,jaggery is used in sweet and savory dishes as well as beverages. Because it is pressed from chemical free sugarcane, it retains natural vitamins and minerals not found in table sugar, such as potassium, magnesium, phosphorus, iron, and calcium.


महागुणी आरोग्यदायी - गुड लाईफ गुळ पावडर:-
रक्ताची शुद्धी
उत्तम पचन क्रिया 
ऊर्जा स्त्रोत

हाडांचा मित्र

अर्धशिशी थांबते

वजन कमी करण्यासाठी

सर्दी-खोकल्यावर गुणकारी

रक्तक्षय टाळतो

स्त्रियांसाठी उपयुक्त

त्वचा आणि केसांचे आरोग्य

महाराष्ट्रात उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते. बहुधा हवामान आणि माती त्याला पूरक आहेत म्हणून. हिरवेगार उसाचे मळे आणि त्यात लांब रसरसीत ऊस बघायला आणि खायला गोड लागतात. या उसाचे फायदेसुद्धा अनेक आहेत. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि मधुर गुड लाईफ  गुळपावडर या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते.
पण सर्वात लांब पट्टा गाठला गुळपावडर  या पदार्थाने. गुळ पावडर ही  सर्व स्वयंपाक घरात अवश्य आढळते . एवढेच नाही तर देवाच्या मंदिरातसुद्धा गुळ खोबऱ्याचा मोठा मान आहे. गुळ/गुळपावडर  जेवणात आणि एक न्याहरीचा प्रकार म्हणून खाल्ला जातो. भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ/गुळपावडर  आहे. चला बघूया या बहुगुणी गुळ /गुळपावडरचे फायदे.

रक्ताची शुद्धी

नियमित आणि योग्य प्रमाणात गुळपावड च्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

उत्तम पचन क्रिया

गुळपावडर  आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळपावडर  जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळापावडर मुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळपावडर  तर रामबाण उपाय आहे.

ऊर्जा स्त्रोत

साखर ही फक्त गोडवा देते आणि एक आधुनिक प्रकार आहे. मात्र गुळापावडर मध्ये  नैसर्गिकता जास्त असल्यामुळे ती  शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळपावडरने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात.

हाडांचा मित्र

गुड लाईफ गुळपावडर  जर आल्याबरोबर खाल्ली तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. दुध आणि गुळपावडर  हे एकत्रित हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे.

अर्धशिशी थांबते

ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी गुळपावडर  आणि शुद्ध तूप एकत्रित रिकाम्या पोटी खाल्ल्याने आराम मिळतो. गुळपावडर ही  अशावेळी लाभदायक ठरतो.

वजन कमी करण्यासाठी

गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे. त्यात आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी जतन करून ठेवण्याची सवयसुद्धा गुळापावडरने मोडण्यास मदत करते व आपले वजन कमी होते.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी

साधारण सर्दी-खोकला झाला असल्यास गुळपावडर च्या चहाने किंवा गुळपावडर   मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. रात्री झोपण्याआधी गुळपावडर  खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.

रक्तक्षय टाळतो

गुळपावडर मध्ये  प्रचंड प्रमाणात लोह आहे. तो खाल्ल्याने शरीरातील लोह कमतरता भरून येते. त्याच्या सेवनाने लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते व अशक्तपणा जाणवत नाही. थकवा आणि ऊर्जेची कमी असे विकार गुळपावडर  खाल्ल्याने होत नाहीत.

स्त्रियांसाठी उपयुक्त

मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गुडलाईफ  गुळपावडर खूप गुणकारी आहे. त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यास मदत करतात. ओटीपोटातील दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर गुडलाईफ  गुळपावडर हा सोपा आणि स्वस्थ उपाय आहे.

त्वचा आणि केसांचे आरोग्य

सुंदर, लांब सडक आणि चमकदार केसासाठी गुडलाईफ गुळपावडरचे सेवन आवश्य करा. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी भरलेली  गुडलाईफ गुळपावडर  त्वचेवर एक छान चमक आणते  आणि सर्व मुरुम, पुरळ आणि डाग नाहीसे करण्यास मदत करते.
रसायनमुक्त आणि पोषक गुडलाईफ गुळपावडर  आरोग्यदायी आहे. पण आपल्याला मधुमेह किंवा अन्य काहीही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकणे फायद्याचे ठरेल.
price/ ₹65

size/ 500 gm













Contact Form

Name

Email *

Message *

Site Developed By: Sachin Ambekar